उरण तालुक्यातील समर्पित कोविड आरोग्य केंद्राला टाळे,सिडकोचे करोडो रुपये जाणार पाण्यात

उरण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळावा यासाठी शासनाच्या वतीने सिडको ट्रेनिंग सेंटर बोकडविरा येथे उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्राला चक्क प्रशासनाने टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे सिडकोने करोडो रुपये खर्चून आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा समर्पित कोविड आरोग्य केंद्र आज धुळखात पडला आहे.

औद्योगिक दृष्ट्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करु पाहणाऱ्या उरण तालुक्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणारे रुग्णालय नसल्याने अनेकांना कोरोनाच्या संकटात उपचारा अभावी आपले प्राण गमवावे लागले.त्यामुळे कोरोना ग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावा यासाठी शासनाने उरण तालुक्यात सोयी सुविधा उपलब्ध असणारे रुग्णालय सुरू करावे अशी मागणी माजी आमदार मनोहर भोईर,उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार,सुधाकर पाटील, कामगार नेते भुषण पाटील तसेच पत्रकार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने लावून धरली होती.त्या मागणीची दखल शासनाने घेऊन सिडको ट्रेनिंग सेंटर बोकडविरा येथे समर्पित कोविड आरोग्य केंद्राची उभारणी सिडको, स्थानिक प्रकल्प व्यवस्थापन यांनी करोडो रुपये खर्चून सामाजिक संस्था, स्थानिक डॉक्टर यांच्या माध्यमातून केली.

त्यामुळे तालुक्यातील अनेक कोरोना बाधित रुग्णांवर तातडीने उपचार होऊ शकले, अशा उपचारांमुळे कोरोना बाधित रुग्णांना जीवदान मिळाले आहे. परंतु कोरोनाच्या संकटात सापडलेल्या उरणकरांना आरोग्याची संजीवनी देऊ पाहणाऱ्या समर्पित कोविड आरोग्य केंद्राला प्रशासनाने टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.ही एक खेदाची बाब आहे.त्यात शासनाने उरणकरांच्या आरोग्यासाठी सिडकोच्या माध्यमातून मंजूर केलेल्या १०० खाटांच्या रुग्णालयाचे घोंगडे आजही भिजत पडले आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सोयी सुविधांने उपयुक्त असणारे समर्पित कोविड आरोग्य केंद्राचे रुग्णालय जैसे थे स्थितीत सुरु ठेवणे काळाची गरज आहे.नाही तर करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्रातील आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या अत्याधुनिक साहित्याना गंज चढून सदर साहित्य निकामी होतील अशी भिंती चक्क डॉक्टर आणि सर्व सामान्य जनतेत व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!